Description
“गणित ही सर्व विज्ञानांची जननी आहे” असे म्हटले जाते. गणिताचा पाया पक्का असल्यास विज्ञानाच्या शाखांचा अभ्यास करणे सोपे जाते त्यासाठी गणिताशी मैत्री करायला हवी. गणिताच्या इतिहासात भारतीय प्राचीन गणितज्ञांचे मोठे योगदान आहे. तसेच आधुनिक गणितातही भारतीय गणितज्ञांनी मोलाची कामगिरी केली आहे. प्राचीन गणितज्ञांमध्ये आर्यभट्ट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य यांनी गणित व खगोलशास्त्र या विषयांना समृद्ध केले. संशोधनास प्रेरणा दिली. अलीकडच्या काळात वैदिक गणिती शंकराचार्य, श्रीनिवास रामानुजन आणि कापरेकर यांनी अनेक गणित संकल्पना मांडल्या. त्या जागतिक स्तरावर पोहोचल्या. अशा या सात गणितज्ञांना गणित सप्तर्षी म्हणावेसे वाटते. हे सप्तर्षी गणित प्रेरक आहेत. 22 डिसेंबर हा रामानुजन जयंती दिवस राष्ट्रीय गणित दिन असतो. तेव्हा गणित सप्ताह, गणित महोत्सव, गणित यात्रा आयोजित होतात. गणित छंद मंडळ सातत्याने गणित कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. या कार्यक्रमांमध्ये गणित सप्तर्षी चे चरित्र, संशोधन, त्यांचे योगदान समजावून दिल्यास गणिताची आवड वृद्धिंगत होईल. गणित सप्तर्षी चे लेखन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. गणित प्रेमी त्याचे स्वागत करतील ही अपेक्षा! नमस्कार! प्राचार्य म. ल. नानकर
![गणित सप्तर्षी: आर्यभट्ट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, रामानुजन, शंकराचार्य, कापरेकर [Paperback] Madhukar Nankar](https://i0.wp.com/swachha.co.in/wp-content/uploads/2024/12/Book-Cover-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80.jpg?fit=1814%2C2529&ssl=1)




Reviews
There are no reviews yet.